लेवा पाटीदार : लेवा पाटीदारांची गणना कुणब्यांमध्ये झालेली असल्याने १९११ नंतर स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नाही. सन १८७२ च्या जनगणनेनुसार संयुक्त खानदेशात यांची संख्या २५,५३५ होती. ते बहुतांश खानदेशाच्या पूर्व भागातच होते. महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारी ही जात प्रामुख्याने यावल, रावेर, एदलाबाद, भुसावळ व जळगाव तालुक्यांत आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यांत आढळते. एरंडोल तालुक्यातील नांदेड व साळवे, जामनेर तालुक्यातील हाताळे व इतर काही ठिकाणी वस्ती आहे.

पट म्हणजे मोठे शेत आणि पट्टी म्हणजे शेतीचा लांब पट्टा व तो धारण करणारा तो पाटीदार असा अर्थ निघतो. गुजरातमध्ये पाटीदारांना पाटील किंवा शेतकरी असेही म्हणतात. गुजरातमध्ये लेवा कणव्यांचे (कुणब्यांचे) पाटीदार आणि शेतकरी कणवी असे दोन भेद आहेत. त्यात पाटीदार याचा अर्थ जमीनदार व सावकार असा असून त्यांची वस्ती खेडा जिल्ह्यातील आणंद, बोर्साद व नडियाद या चरोतरमध्ये विशेष करून अधिक आहे. या भागातील पाटीदार स्वतःस कुलिया (नार्वा किंवा कुलिया) म्हणजे जमीनदार व इतर भागातील कुणब्यांना अकुलिया (सेजा किंवा अकुलिया) म्हणजे कूळ संबोधतात . ब्रिटीश राजवटीपुर्वी प्रमुख पाटीदार शासन व कुळांमधील मध्यस्थीचे काम करीत व कौशल्याने सारा वसूल करून शासनास देत. गुजरातमध्ये पाटीदारांचे लेवा व कडवा असे दोन प्रकार असून लेवा म्हणजे मवाळ आणि कडवा म्हणजे कट्टर असा अर्थ निघतो. ज्या खेडा जिल्ह्यातून हे लोक आले आहेत त्या जिल्ह्याच्या १८८२ च्या गॅझेटिअरमध्ये यांच्याविषयी पुढील माहिती दिलेली आहे.

” … of the different classes of cultivators, the most important are the Lewa and  Kadwa Kanbis. The best farmers in the district, sober, quiet, industrious and except on such special occasions as marriages, thrifty, they …”

प्रमुख जाती व जमाती

पाटीदारांची वस्ती मध्य प्रदेश, राजस्थान व पश्चिम बंगालमध्येही आहे. मात्र पश्चिम बंगालमधील मिदनापुर जिल्ह्यातील पाटीदार हे भाट (गोष्टी सांगणारे) असून त्यांचा संदर्भ या पाटीदारांशी जोडता येणार नाही. देविसिंह चौहानांच्या मते पाटीदार लोक इराणमधून खैबरखिंडीमार्गे हिंदुस्थानात आले. लेवा पाटीदार मूळ गुजरातमधीलही नाहीत. पूर्वी राजस्थान, पंजाब व मध्य प्रदेशात पाटीदारांची संख्या अधिक होती. अजूनही उज्जैन, मंदसोर, निमार या मध्यप्रदेशातील जिल्ह्यांमध्ये पाटीदार मोठ्या संख्येने आहेत. बऱ्याच लेवा पाटीदार वंशावळी चोपड्याचे भाट, त्र्यंबकेश्वराचे क्षौरकर्म करणारे ब्राम्हण व काशीचे पंडये यांनी ठेवलेल्या आहेत. चोपडया भाटांच्या नोंदी व्यवस्थित आहेत. त्यांच्या नोंदीत असे दिसून आले की, लेवा पाटील खानदेशात संवत ११०० च्या सुमारास गुजरातमधून स्थलांतरीत झाले. भाटयांच्याच मुलाखतीनुसार  खानदेशात व गुजरातमध्ये येण्यापूर्वी पाटीदार राजस्थानात होते. राजस्थानातील स्थानिक राजपूत टोळ्यांनी  त्यांना हुसकावून लावल्यावर ते चितोडगड, मल्हगड, काठेवाड मार्गे गुजरातमध्ये आले व रेवानदीच्या काठी  स्थायिक झाले. रेवानदीच्या काठी  स्थायिक झालेल्यांना रेव व अपभ्रंशाने लेवा पाटीदार असे नाव प्राप्त झाले.  गुजरातमधील लेवा कणवी उतरेकडील गुजर वंशाचे आहेत. जिल्यात यांना पुर्वी पाजने कुनबी म्हणत. पाजने शब्द पावाखंडाशी (पावागड) जोडला जात असून पावागड पुर्वी गुजरातचा भाग मानत. पुढे गुजरातवर मुसलमानांच्या स्वाऱ्या होऊ लागल्यावर खेडा जिल्यातील लेवा पाटीवारांमधील काही लोक पावागड येथे स्थलांतरीत झाले. तेथे काही पिढ्या राहिले. पावागडही मुसलमानांनी ताब्यात घेतल्यावर तेथून ते खानदेशात आले. इकडे आल्यावर साळी कारागिरांबरोबर (विणकर) सुतास ब्रशासारख्या फणग्याने पांजण्याचे काम करू लागल्याने त्यांना पांजण्या नाव प्राप्त झाले. पुढे शेती करू लागल्याने त्यांना पांजणा कुणबी नाव मिळाले. पांजणा कुणबी म्हणजेच जिल्हयातील लेवा पाटीदार होत . त्याच्या या किंवा लेवा , नवघरे , कंहारकर श्योरयाणे या चार पोटशाखा मानल्या जातात . यातील लेवा हे मूळ असून त्यांच्यातून भांडून बाहेर उलेल्या नरू कुटुंबांच्या वंशास नवघरे म्हणतात , धोरगहाणे व कंधारकर ही नावे रावेर तालुक्यातील रगहाण व भुसाव तायुक्यातील कंडादी या गावावरून पडली आहेत . फुटून निघाल्यावर ते पआपसांत बेटी व्यवहार करीत नसत . आता लेखा , नवघरे व कंडारकर खेटीव्यवहार करू लागले सून नवघरे व केडारकर हे भेव नाहीसे होत चालले आहेत . मात्र अजूनही परंपरावादी लेवा लोक रगहाण्यांशी बेटी व्यवहार करीत नाही . पुर्वी पांजणा जातीचा पंचायतप्रमुख यावलचा देशमुख शयातील थोरगव्हाणे होता . उपरोक्त चार पोटभेदांमध्ये बेटी व्यवहार बंद झाल्यानंतर यावलचा मुख फक्त थोरगव्हाणे पोटभेदाचा पंचायतप्रमुख राहिला व बाकीच्या लेवा पोटभेदांचे पंचायत , ( अपद भोरटेक येथिल पाटलाकडे गेले . भोरटेक येथिल लेवा पाटीवारांना तेथिल कोळ्यांनी हुसकून वल्यावर पाडळसेचा पोलिस पाटील लेवा पाटीदार पंचायत प्रमुख बनला . महाराष्ट्रातील इतर कुणबी मांसाहारी असले तरी गुजरातेतील लेवा पाटीदारांप्रमाणे हेही काहारी असून मद्यपान निषिद्ध मानणारे आहेत . लेवा गुजर व बाड गुजर यांची भाषा अहिराणी नीशी जास्त मिळतीजुळती आहे . तर लेवा पाटीदारांची भाषा मात्र वहाडी मराठीशी जास्त मिळतीजुळती गुजरातेतील मोभना कुणबी हे सुद्धा स्वतास लेवा पाटीदार समजतात , ते सत्पथी आहेत . स्यातील फैजपूर , पाडळसे परिसरातील सत्पंथी लेवा पाटीदार यांचेच वंशज असावेत , ते मांस व दास र्य मानतात . हे पिराणा , अहमदाबाद , नवसारी व बहाणपूर येथिल पीरांनाही भजत . सत्पंथी लोक रातेत मोठ्या प्रमाणात आहेत . इकडे आल्यावरही त्यांनी पंथाशी आपली बांधिलकी कायम ठेवली . तोद – कोळवद , सावदा , न्हावी . कठोरे येथे स्वामीनारायण पंथाची मंदिरे आहेत . जिल्ह्यातील मीनारायण पंथीयांचे मुख्य देवत गुजरातमधील बहतावा येथिल सहजानंद स्वामीनारायण हे आहे . ह्यातील यांची वस्ती शिरपूर – चोपडा – रावेर महामार्गाच्या उत्तरेकडे आहे . बहुतांश लेवा पाटीदार लांतरानंतर वारकरी झाले . सावदा , हिंगोणे , बामणोद , भालोद परिसरातील काही लेवा पाटीदारांनी नुभाव पंथाचा स्विकार केला .

लेवा पाटीदारांच्या जात पंचायतीला भोरगांव म्हणत. भोरगांव पंचायत म्हणजे बारा पंचक्रोशीतील दांचा समाजात विलक्षण दरारा होता . लग्नविषयक भांडणतंटे , सोडचिठी , संपत्तीविषयक , भाऊबंदकीचे लेटे तसेच जाततंटे ही पंचायत सोडवत असे . ही पंचायत पाडळसे व भोरटेक ( यावल तालुका ) या दोन्ही जांजवळून वाहत असलेल्या मोर नदीच्या वाळवंटात वर्षात एकदाच घेतली जात असे . सत्पंथीयांमधील काही रिवाज दंड करून या पंचायतीमध्ये बंद करविले होते . याबाबत एक आख्यायिका अशी की , तत्पंथी एका विधीत कणकेची गाय करून कापीत . हा विधी मुसलमानी मानून त्यांना जातीबाहेर वाडण्याबाबत तंटा उद्भवला . परंतु चोपड्याच्या भाटाच्या माहितीवरून हा विधी गायत्रीमंत्राचा भाग मानला गेल्याने त्यांना काही दंड करून तंटा मिटविण्यात आला . बालविवाहाची प्रथा प्रचलित असतांना गर्भावस्थेत जमविलेली लग्ने मोडणाऱ्यांनासुद्धा पंचायत दंड करीत असे . दोन मित्र किंवा नातेवाईक लास मुलगा व दुसऱ्यास मुलगी झाल्यास त्यांचे लग्न जमवून ठेवीत . अश्या वेळी दोन्ही गर्भवतींच्या देबीला कुंकू लावीत . यालाच बेंबी पूजणे असे म्हणत . ही प्रथा आता पूर्णपणे बंद झाली आहे . पूर्वी गुजरातेतील काही लेवा लोकांचा लग्नाचा मुहूर्त बारा वर्षांनी येत असे व लग्नसोहळा फक्त तीन दिवस चालत असे . या तीन दिवसांत सर्द मुला – मुलींची लग्ने उरकावी लागत . बेंबीपूजन झालेली कित्येक लग्ने पाळण्यात असतांनाच लावली जात . परंपरेनुसार लेवा पाटीदार हुंडा घेत नसत . आपल्या कुवतीनुसार लग्नखर्च करीत असत . वधूपक्ष व वरपक्ष खर्च वाटून घेत . विशेषतः वधू – वरांचे दागिने व बस्त्याचा खर्च निम्मे वाटून घेत असत . मागील वीस – पंचवीस वर्षात हुंडाप्रथा बोकाळली आहे . या समाजातील अनेक लोकांना आपली गोत्रे माहीत नाही . लेवा गुजरांप्रमाणे यांची अंबिक , अत्री , भारद्वाज , गर्य , गौतम , जामदग्न्य , काश्यप , कौशिक , कौशल , प्रयाग , आणि वशिष्ठ ही अकरा गोत्र असावीत . लग्न जमवितांना गोत्रापेक्षा कुळांना महत्व देतात . सकुळ विवाह , मावसबहीण … मामेबहीण . आतेबहीणीशी विवाह निषिद्ध मानतात . सगोत्र विवाह करीत नाहीत , परंतु निषिद्धही मानत नाही . बहुतांश आडनावे म्हणजे कुळे असतात . परंतु सर्वच आडनावे कुळे नसतात . कुळे नसलेली आडनावे साधारणपणे पाटील . महाजन , चौधरी . देशमुख . वाणी , राणे अशी वतनावरून पडलेली आहेत . कुळे साधारणपणे बोरोले . झोपे . नारखडे . येवले . फेगडे . जावळे . गाजरे , धांडे , तळेले . ठोंबरे , नेमाडे , दहाटे . नेहेते . बोर्डे , खर्चे . ढाके . खडसे . भोळे , नाफडे , कोलते . टेकाडे , भंगाळे , वहाडे , पाचपांडे . होले , वाघोदे , रोठे , रडे . जंगले , भारंबे , फिरके , लढे , किनगे , किरंगे . सरोदे अशी आहेत . आर्थिक परिस्थिती अनुरुप लेवा पाटीदारांचा विवाह सोहळा पाच , तीन अथवा दोन दिवस चालत असे . परंपरेने त्यांचे विवाह पौराणिक पद्धतीने करण्यात येतात . देवक व चेतनावादी असल्याने गाईची पुजा करणे अनिवार्य मानतात . देवक बसविण्याच्या प्रथेस बेमाथन असे म्हणतात . लग्नात आंबोला भात शिजविणे , गौरधर व तोरणताटीस महत्व असते . लग्नाच्या दिवशी दोन्ही पक्षांकडे भाऊबंदांना बोलावून आंबोला भात शिजविण्याचा कार्यक्रम करतात . गौरधर वधूवरांना हळद लावण्यापुर्वी दोन्ही पक्षांकडे करतात . माजघरांत चार कोपऱ्यांत कुंभाराकडून वाजत आणलेल्या नव्या मडक्यात सात मडक्यांची एक अशा चार उतरंडी करतात . त्यांना सुताचे चार फेरे गुंडाळतात . मध्यभागी लामण दिवा तेवत ठेवतात . लग्न विदा होते तेव्हा वरवधू गव्हाची धार सोडून वधूपक्षाकडील दिवा मालवतात . तोरणताटी ही मंगलकार्याची द्योतक आहे . प्रत्येक लग्नघरी आंब्याची पाने लावलेली तुरखाट्यांची तोरणताटी लावणे अनिवार्य मानतात . लग्नाच्या दिवशी सकाळी दरवाज्यासमोर लावलेली तोरणताटी

सना महिना काढीत नाहीत . वरास वरपक्षाकडे व वधूस वधूपक्षाकडे हळद लावतात. सीमांतपूजनाला शेवंती असे म्हणतात. लग्न लागल्यानंतर वधुवरांनी एकमेकांचे हात घेण्यास हातोई असे म्हणतात . वधूच्या पदराची गाठ उपरण्यास बांधतात ( गाठजुळा ) , सप्तपदीला चवरी – भवरी म्हणतात . वधू वराच्या आईकडे अहेरासहीत येते तेव्हा सूनमुखदर्शन घेण्यात येते . बलुतेदारांना दिल्या जाणाऱ्या दक्षिणांना मांडव चुकविणे असे म्हणतात . वरपक्षाकडील मंडळीकडून अहेराच्या आधी कानपिळीनिमित्त वधूच्या भावास ( सूक्या ) भेटवस्तू दिल्या जातात , लेवा पाटीदारांच्या कुलदेवता वणीची सप्तशृंगी , तुळजापूरची भवानी , माहूरची रेणूकादेवी आणि कुलदैवत खंडोबा , अट्रावलचा मुंजा , बुलडाणा जिल्ह्यातील जाईचा दत्तात्रय ही आहेत . पहिले बाळंतपण माहेरी होते . सहाव्या दिवशी सटवाईची पूजा करतात . सटताईची सोन्या चांदीची प्रतिमा मनगटाला काळ्या दोऱ्याने बांधतात . सुहेर बारा दिवस पाळतात . बाराव्या दिवशी घर शेण व – पांढऱ्या मातीने सारवून शुद्ध करतात व सवाष्णींना घुगऱ्या वाटून बाळाचे नाव ठेवतात . लेवा पाटीदारांमध्ये मुंज करीत नाहीत . परंतु लहानपणी किंवा लग्नाचे आधी मुहूर्त कान टोचून घेतात . लेवा पाटीदारांमध्ये रोटपूजा हा एक आवश्यक धार्मिक विधी असतो . प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असून हा सण म्हणजे ग्रामदेवतेचा उत्सव असतो . नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी ही पूजा करतात . कुटुंबातील सर्वजण दिवसभर कडक उपवास करतात व रात्री पूजा करून एकत्रितपणे उपवास सोडतात . उपवास सोडल्यावर महिला रोटाचे गाणे म्हणतात. रंबाई या खानदेशातील देवीची चक्रपूजा हा विधीही रोटपूजेसारखाच असतो . या समाजातील मुलींचा मुख्य उत्सव म्हणजे भाद्रपदातील भुलबाई किंवा बुलाबाईचा सोहळा . बहुसंख्य लेवा पाटीदार आषाढी, कार्तिकी एकादशी व महाशिवरात्रीचा उपवास करतात . फाल्गुन महिन्यात ठराविक दिवशी कुलदेवतांची पूजा करतात . होळी मोठ्या उत्साहाने साजरी करतात . अक्षयतृतियेला लेवा पाटीदार शेतकरी अवजारांची पूजा करतात . या दिवशी घागर भरण्याचा ‘ विधी म्हणजे पितरांचे श्राद्ध करतात . मुली माहेरी येतात . सालदारांचे नवीन साल ( सालीना मोबदला ) याच दिवशी ठरवितात . लेवा पाटीदार शेतकरी हा ब्राम्हण , पुजारी तसेच न्हावी . गुरव , चांभार . कुंभार , सोनार . धोबी , माळी . महार या बलुतेदारांना हंगामात खळ्यातच धान्याच्या राशीतून सढळ हाताने धान्यरुपी बलुता देत असतो . अलीकडे बलुतेदारी पद्धत बंद होत असली तरी लेवा पाटीदार समाजाने ती टिकवून ठेवली आहे . इ.स. १८८० मध्ये प्रकाशित गॅझेटिअरमध्ये यांच्यासंबंधी पुढीलप्रमाणे उल्लेख आहे . ” Truthful , orderly and frugal almost to niggardliness , they are the most hardworking , industrious and simpleminded of the Khandesh agricultural population . Since the great dispute which broke of their caste , they have been remarkable for the apparent absence of jealousies and treacheries which distinguish the Gujar Kunbis ” ” लेवा पाटीदारांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी आता वाडमय , साहित्य , वैद्यक , अभियांत्रिकी व वकिली क्षेत्रात ते पुढे येत आहेत . सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी याच समाजाच्या . – गुजर : जळगांव जिल्ह्यातील गुजर शेती व्यवसायामुळे कुणब्यांचीच पोटजात मानली जाते . इ.स. १ ९ ३१ च्या जनगणनेनुसार लेवा किंवा रेवा कुणब्यांची जिल्ह्यातील संख्या ८२,७१४ होती . त्यात

प्रामुख्याने लेवा पाटीदार आणि लेवा गुजरांचा समावेश होता . महाराष्ट्रात गुजर प्रामुख्यान जान आणि धुळे जिल्ह्यात अधिक आहेत . गुजरांच्या वंशावळी ठेवणाऱ्या भाटांच्या नोंदीनुसार गुजराती उत्पत्ती मर्याद ऋषीपासून झालेली आहे . हे लोक उत्तर भारतातून किंवा गुजरातेतून आले असावेत . काही इतिहासकारांच्या मते पाचव्या शतकाच्या अखेरीस भारतावर हूण लोकांनी आक्रमण केले तेली त्यांचेबरोबर आलेल्या अनेक टोळ्यांमध्ये गुजरांच्याही टोळ्या होत्या . गुजर ही पशुपालक जात असून , पंजाब , हिमाचल प्रदेश , बुंदेलखंड , राजस्थान , गुजरात , उत्तर प्रदेश व काश्मिरमध्ये त्यांची वस्ती आहे . पंजाब व काश्मिरात बाटलेले सुन्नी मुसलमानही पुर्वी गुजर होते . डॉ . रामकृष्ण गोपाळ भांडारकर स्मिथ यांच्या मते युरोप व आशिया सीमेवरील खर्गर लोक हेच गुर्जर असावेत . परंतु चिं . वि . वैद्य , व ओझा यांच्या मते गुर्जर हा प्रदेश होता . त्यात जोधपूर , जयपूर , अलवार व मेवाडच्या उत्तर भागाचा समावेश होता . हे लोक तेथिल असून मूळ आर्य आहेत . प्रथम ते पशुपालक होते . नंतर शेतीकडे वळल्यामुळे त्यांना गुजर कुणबी नाव प्राप्त झाले .