
मध्य प्रदेशातील भिकन गाव तालुक्यातील साईखेडा येथील रहिवासी तुषार तळेले व त्यांची पत्नी कीर्ती तळेले यांचा विवाह ०३ मार्च २०१९ रोजी झाला होता मात्र किरकोळ कारणावरून आपसात कुरबुरी वाढल्या त्यातून टोकाची भूमिका घेऊन एक मुलगा असलेले हे दोघे ०६ मे २०२३ रोजी फारकत घेऊन विभक्त झाले यानंतरही दोघांमध्ये जिव्हाळा असल्याने अवघ्या ५६ दिवसात त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. भोरगाव लेवा पंचायतीने या दोघांचा समेट घडवून विस्कळीत झालेली संसाराची घडी बसवली पुन्हा एकत्र येण्याचा विचार करून त्यांनी भोरगाव लेवा पंचायतीकडे अर्ज केला. त्यानंतर अर्जानुसार दोघांना पंचायतीमध्ये बोलावण्यात आले. चर्चेअंती दोघांनी एकत्र येण्यासाठी संमती दर्शवली नंतर भोरगाव पंचायतीने कीर्तीला साडी चोळी देऊन पतीसोबत सासरी रवाना केले स्वाती मोरे यांनी दोघांना पेढा भरून गोड राहून संसार करा असा सल्ला दिला. अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, सचिव बाळू पाटील, संचालक परीक्षीत बऱ्हाटे हजर होते.
दरम्यान भोरगाव पंचायतीच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्या सोबत कौटुंबिक कलह मिटवणे. विभक्त जोडप्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला जातो.