भोरगाव लेवा पंचायत, ठाया पाडळसे, विभाग-भुसावळ

समाजातील कुटुंब नोंदणी

सामाजिक सलोखा जपणे

लेवा युवा नोंदणी

आमच्या बद्दल

लेवा पाटीदार : लेवा पाटीदारांची गणना कुणब्यांमध्ये झालेली असल्याने १९११ नंतर स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नाही. सन १८७२ च्या जनगणनेनुसार संयुक्त खानदेशात यांची संख्या २५,५३५ होती. ते बहुतांश खानदेशाच्या पूर्व भागातच होते. महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारी ही जात प्रामुख्याने यावल, रावेर, एदलाबाद, भुसावळ व जळगाव तालुक्यांत आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यांत आढळते. एरंडोल तालुक्यातील नांदेड व साळवे, जामनेर तालुक्यातील हाताळे व इतर काही ठिकाणी वस्ती आहे. लेवा पाटीदारांची भाषा वऱ्हाडी मराठीशी जास्त मिळतीजुळती आहे. लेवा पाटीदारांच्या जात पंचायतीला भोरगांव म्हणत. भोरगांव पंचायत म्हणजे बारा पंचक्रोशीतील गावांचा समाजात विलक्षण दरारा होता. लग्नविषयक भांडणतंटे, सोडचिठी, संपत्तीविषयक, भाऊबंदकीचे तंटे तसेच जाततंटे ही पंचायत सोडवत असे. ही पंचायत पाडळसे व भोरटेक (यावल तालुका) या दोन्ही गावाजवळून वाहत असलेल्या मोर नदीच्या वाळवंटात वर्षात एकदाच घेतली जात असे.

आमच्या बद्दल बरच काही

सकल लेवा पाटीदार या संस्थेमार्फत समाजासाठी बरेच उपक्रम राबविले जातात.

ध्येय व इतिहास

भोरगाव पंचायत च्या माध्यमातून समाजिक सलोखा, कौटुंबिक सलोखा, सामाजिक एकी जपणे हाच एक उद्देश. सन १८७२ च्या जनगणनेनुसार संयुक्त खानदेशात यांची संख्या २५,५३५ होती. ते बहुतांश खानदेशाच्या पूर्व भागातच होते. महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारी ही जात प्रामुख्याने यावल, रावेर, एदलाबाद, भुसावळ व जळगाव तालुक्यांत आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यांत आढळते. एरंडोल तालुक्यातील नांदेड व साळवे, जामनेर तालुक्यातील हाताळे व इतर काही ठिकाणी वस्ती आहे. लेवा पाटीदारांच्या जात पंचायतीला भोरगांव म्हणत. भोरगांव पंचायत म्हणजे बारा पंचक्रोशीतील दांचा समाजात विलक्षण दरारा होता . लग्नविषयक भांडणतंटे , सोडचिठी , संपत्तीविषयक , भाऊबंदकीचे लेटे तसेच जाततंटे ही पंचायत सोडवत असे . ही पंचायत पाडळसे व भोरटेक ( यावल तालुका ) या दोन्ही जांजवळून वाहत असलेल्या मोर नदीच्या वाळवंटात वर्षात एकदाच घेतली जात असे.

सेवा

सकल लेवा पाटीदार ही संस्था सामाजिक प्रबोधन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था होय. सदर संस्था ही सामाजिक प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाताळत असते. आणि समाज प्रबोधनाच्या दृष्टीने समाजातील लोकाना संस्थे मार्फत खालील सेवा दिल्या जातात.

आमच्या बद्दल पडणारे प्रश्न

संस्थे मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांवर शुल्क आकरण्यात येते का?

नाही, सदर सेवा या सद्यस्थितीत निशुल्क आहेत. यासाठी कुठलेही शुल्क आकरण्यात येत नाही.

वधू-वर सूचितील माहिती या संकेतस्थळावर पाहायला मिळेल का?

होय सदर माहिती ही संस्थेच्या www.levayuva.com या संकेतस्थळावर पाहायला मिळू शकेल.

कुटुंब नोंदणी, युवक नोंदणी व वधू व सूची नोंदणी कशी करता येईल?

युवक नोंदणी, कुटुंब नोंदणी व वधू-वर सूची नोंदणी ही ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळावर तसेच www.levayuva.com या संकेतस्थळावर तसेच ऑफलाइन पद्धतीने संस्थेच्या कार्यालयात फॉर्म भरून नोंदणी करू शकता.

संपर्कासाठी विनंती

आमच्याशी संपर्कासाठी विनंती करण्यासाठी खालील फॉर्म भरा. आमचे प्रतिनिधि आपल्याशी लवकरच संपर्क करतील. आपली विनंती आमच्यासाठी मोलाची आहे.


कार्यकारिणी

सकल लेवा पाटीदार संस्थेची कार्यकारिणी आपल्या सेवेसाठी हजर..  

अॅड. प्रकाश पाटील
अध्यक्ष
सौ.आरती चौधरी
समुपदेशन कक्ष, अध्यक्ष
Adv. Prakash Patil
Secretory

प्रशस्तीपत्र

संस्थेच्या कार्याबद्दल समाजातील नागरिकांचे वक्तव्य